पुणे : विधानपरिषदेचे माजी सदस्य डॉ. मा. प. मंगुडकर यांचे वैजापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.
हेही वाचा – लंडनमधील ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पुण्यातील ४२ विद्यार्थ्यांना वादनाची संधी
डॉ. मंगुडकर हे दोन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांची संपूर्ण कारकीर्द पुण्यामध्ये गेली. पुणे महानगरपालिका शताब्दी ग्रंथाचे लेखन आणि संकलन त्यांनी केले होते. अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा नावलौकिक होता. गेली अनेक वर्षे ते छत्रपती संभाजीगरमधील वैजापूर येथे मुलीकडे वास्तव्यास होते.