पुणे  : जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ९ ते १२ या वेळेत नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

अंत्यविधी सोमवारी दुपारी ४  वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक या ठिकाणी होणार आहे. बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यानी जुन्नर विधानसभा मतदार संघातून १९८५ ते २००९ या कालावधीत सलग सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते. प्रकृतीमुळे २०१४ पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
AAP leader and Delhi minister Kailash Gehlot resigned from party
Kailash Gehlot resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा झटका; कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी आरोपांची राळ उठवत दिला राजीनामा
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Ambernath Vanchit Bahujan Aghadi, Ambernath,
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम

हेही वाचा >>> फलटण ते पंढरपूर रेल्वेला गती! लवकरच कामाला मंजुरी मिळण्याची चिन्हे

पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वल्लभशेठ बेनके हे १९८५ साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर १९९० मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष २००४ व २००९ मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके  यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.