लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांडे यांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची मंगळवारी (१० सप्टेंबर) भेट घेतल्याने लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार लांडे यांना सलग दोन वेळा भोसरीतून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. ‘मला उमेदवारी देत नसाल, तर आयात उमेदवार देऊ नका. महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, अजित पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याने लांडे नाराज झाले. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ या महायुतीच्या सूत्रामुळे विधानसभेलाही संधी मिळणार नसल्याने लांडे यांची अडचण झाली आहे.

आणखी वाचा-अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं

विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे जवळचे नातलग राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असून ते आमच्यासोबत असल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले होते. मात्र लांडे यांनी सावध भूमिका घेतली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच त्यांनी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभास्थळाचा आढावा घेतला होता. मात्र, ते सभेला गैरहजर राहिले होते. त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तेव्हापासून लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. लांडे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची, तर मंगळवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यात नकार दर्शविला. मात्र भेट झाल्याचे त्यांनी नाकारले नाही.

Story img Loader