शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्याच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते.  पाषाण येथे रात्री ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ आणि २००९ मध्ये निवडून आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- प्रशासनाचा ‘प्रभावी कारभार’; करोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर जास्त पैसे वर्ग; आता वसुलीचे आव्हान

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. निम्हण यांनी शिवसेना विभाग प्रमुख, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर काम केले होते. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची शिवसेना शहर प्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासह काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते. त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. १९९९ ते २०१४ पंधरा वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla vinayak nimhan passed away due to heart attack pune print news dpj