लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : आंबेगाव तालुक्यातील माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
विकास किसनराव बाणखेले (वय ५२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास बाणखेले गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाटी बाहेर पडले. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांना भेटले. मित्रांबरोबर गप्पा मारुन ते घरी गेले. खोलीत गेल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. त्यांचे मोठे भाऊ रामदास यांनी त्यांना जेवण करण्यासाठी हाक मारली. मात्र ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा विकास यांनी वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहिती बाणखेले कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. बाणखेले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी किंवा मोबाइलवरुन कोणाला संदेश पाठविला नव्हता. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली, अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली. पोलीस हवालदार सुमीत मोरे तपास करत आहेत. विकास बाणखेले यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. दिवंगत खासदार किसनराव बाणखेले यांचे ते धाकटे चिरंजीव होते. बाणखेले यांच्या आकस्मिक निधन झाल्याची माहिती मिळताच मंचर परिसरात शोककळा परसली. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मंचर परिसरातील राजकीय कार्यकर्ते, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.