पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने शहराच्या मध्य भागात घबराट उडाली.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते? (फोटो सौजन्य पीटीआय)
आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते?
AAP MLA Gurpreet Gogi
पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
brothers and sister involved in mira road murder
मिरा रोड गोळीबार प्रकरणाचा छडा; व्यावासायिक वादातून भावा-बहिणींनी केली हत्या
Image of a well
पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू

हेही वाचा – लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर महाग

हेही वाचा – झुंडशाही, समाज माध्यमातील टीका, टिपणीवर न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य; म्हणाले, “न्यायव्यवस्था टिकवण्यामध्ये…”

गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader