पुणे: देशभरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या महिला सोबत संवाद साधण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याशी संवाद साधण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योती कदम म्हणाल्या की, मी मूळची संभाजीनगर येथील असून माझ शिक्षण बी.ई.मॅकेनिकल आणि एमबीए मार्केटिंग झाले. त्याच दरम्यान मी एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत आई, बाबांना सांगितल्यावर त्यांच्यासह सर्व मंडळीनी मला पाठिंबा दिला. तर ही गोष्ट १९९८ मधील असून सर्वांनी वेळोवेळी सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने परीक्षा पाहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाले. वर्ग एक मधून प्रशासकीय सेवेत रुजू झाले. आज जवळपास प्रशासकीय सेवेत येऊन तब्बल २३ वर्षाचा कालावधी होऊन गेला.हवेली प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, माढा कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी यासह अनेक भागात विविध पदावर काम करण्याची संधी मिळाल्याच त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-“…तर मोदी नवीन युनो उभी करतील”, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिक विविध कामांच्या संदर्भात येत असतात. कार्यालयामध्ये येणार्‍या नागरिकाच्या चेहर्‍यावर प्रचंड ताण आणि आपल काम होईल की नाही ही भावना असते. पण मी येणार्‍या प्रत्येक नागरिकाला आजपर्यंत न्याय देण्याच काम केले आहे. येताना जरी ताण तणाव त्या नागरिकाच्या चेहर्‍यावर असेल पण येथून बाहेर पडताना. एक आनंद आणि आपल काम झाल्याची भावनेन बाहेर पडेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करित आले आहे. त्यामुळे मला विविध कामात यश मिळाल्याचे त्यानी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की,या सर्व प्रशासकीय सेवे दरम्यान २०१४ मध्ये महाराष्ट्रसह इतर पाच राज्याच्या निवडणुका होत्या. त्यावेळी माझ्यावर पर्वती विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी होती.त्या मतदारसंघात ४ लाखांच्या आसपास मतदार होते.त्या निवडणुकीचे मतदान झाले आणि मतमोजणीचा दिवस उजाडला.त्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडे २०० कर्मचारी होते.तर ४ लाख मतदान मोजण्यास ४ ते ५ तास लागतील असा सर्वांना अंदाज होता. पण मी अगोदरच सर्वांना मतमोजणी बाबत विशेष मार्गदर्शन करून आपल्या कामांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे मतमोजणी वेळी कोणत्याही टेबलवर काही मिनिटामध्ये मतमोजणीचा निकाल येत होता. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदार संघाचा निकाल १ तास ५० मिनिटात लागला.

आणखी वाचा-भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार

देशात आजवर झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा एवढ्या कमी वेळात निकाल लागल्याचे निवडणुक आयोगामार्फत जाहीर करण्यात आले. त्या निकालाची दखल घेऊन भारत निवडणुक आयोगाने मला सन्मानित करण्याचे ठरविले आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम हे होते. मला विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. त्यावेळी मला व्यासपीठावर वेल डन, ग्रेट अशा शब्दात त्यांनी माझ कौतुक केले. आजपर्यंत माझ्या कामात त्याचे ते शब्द कायम प्रेरणा देत राहिले आहे. त्या निकालाची दखल आजपर्यंत झालेल्या निवडणुका दरम्यान घेतली जात असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,आज आपण नवरात्र उत्सव साजरा करित आहे.त्या निमित्ताने एक सांगावे वाटते की,अधिकाधिक महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येऊन, तसेच कोणत्याही संकटाला किंवा अपयशाला न घाबरता,काम करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former president apj abdul kalams words continue to inspire says resident deputy collector jyoti kadam svk 88 mrj