विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) माजी अध्यक्ष, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर (वय- ७९) यांचे आज(शुक्रवार) पुण्यात राहत्या घरी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.

१९९८ ते २००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे निगवेकर यांचा उल्लेख ‘भारतातील शैक्षणिक गुणवत्तेचे पितामह’ असा करत. उच्च शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराचा त्यांनी प्रसार केला व गुणवत्तेवर विशेष भर दिला.

दरम्यान, करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेले आहे.

Story img Loader