भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं आज पु्ण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

हेही वाचा – पुणे : नोकरीच्या आमिषाने संगणक अभियंत्याकडून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक

Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे प्रथम महापौर आणि माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते. तसेच ते विद्याभारती शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्‍य असलेले डॉ. शेखावत हे १९८५ मध्‍ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून निवडून आले होते. ते १९९१ मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. १९९५ च्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत मात्र त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला होता. ७ जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील हे विवाहबद्ध झाले होते. अनेक दशके ते अमरावतीच्‍या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. गेल्‍या काही वर्षांपासून ते पुण्‍यात वास्‍तव्‍याला होते.

Story img Loader