पुणे : ज्येष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर येथील शिरोळ येथे जन्म झालेले गुरव हे निसर्गचित्रकार म्हणून ख्यातकीर्त होते. धनगर या संकल्पनेवर आधारित त्यांची चित्रे प्रसिद्ध आहेत. दिल्ली येथील राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या वार्षिक चित्रप्रदर्शनामध्ये गुरव यांच्या चित्रांची निवड झाली होती. त्यांच्या चित्रांची देशभर प्रदर्शने भरविण्यात आली होती. राज्य सरकारच्या वतीने उत्कृष्ट चित्रकार आणि उत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. जेथे कला शिक्षण घेतले त्याच अभिनव कला महाविद्यालयामध्ये सहायक अध्यापक म्हणून गुरव रूजू झाले होते.

हेही वाचा – कात्रज भागात ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक

हेही वाचा – भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

अध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून ३५ वर्षे अध्यापन कार्य केलेले गुरव २००३ मध्ये प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला मार्गदर्शन मिळण्याच्या उद्देशातून गुरव यांनी पौड येथे सुंबरान आर्ट फाउंडेशन सुरू केले होते. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल गुरव यांचा शिरोळ भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.