पुणे : माजी महापौर मोहनसिंग राजपाल (वय ७७) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. राजपाल हे पुण्याचे पहिले शीख महापौर होते. राजपाल यांच्या पार्थिवावर रविवारी (२८ एप्रिल) वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गणेश पेठ गुरुद्वारा विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत नगरसेवक झालेल्या राजपाल यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत पुण्याचे महापौरपद भूषविले होते. महापौर म्हणून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणारे राजपाल आपल्या नर्मविनोदी भाषणासह भांगडा करून सर्वांना जिंकून घेत असत. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.
हेही वाचा…युजीसीचा मोठा निर्णय… मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशबंदी…
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रास्ता पेठ येथील निवासस्थानी रविवारी दुपारी बारा ते चार या वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर वैकुंठ स्मशाानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.