पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना महाविकास आघाडीतील धुसपुस थांबण्याचे नाव घेत नाही. हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक महादेव बाबर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हडपसरचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंंबा जाहीर केला आहे. यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. बाबर यांनी बधे यांना दिलेल्या पाठिंंब्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : “तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले”, पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य; रोख कोणाकडे?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
shambhuraj desai replied to uddhav thackera
“मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा…अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !

महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाबर इच्छुक होते. मात्र जागा वाटपामध्ये हडपसरची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप निवडणूक लढवित असून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार चेतन तुपे यांना संधी दिली आहे. या मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गंगाधर बधे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा…धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका

बधे यांना पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार बाबर यांनी पत्रकार परिषद जाहीर केले. ते म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाची मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी बधे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे करण्यात आले आहे. बधे यांनी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले, म्हणून त्यांना पाठिंंबा दिला आहे.