पुणे : युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरूणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे दिला.युवकांच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. युवा संघर्ष यात्रेचे आयोजक, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा