पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी महायुतीमध्ये सहभागी होत आहे. तर आगामी कालावधीत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन, पुण्यातील ठाकरे गटाचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल यांचासह अन्य तीन महिला नगरसेविका असे एकूण पाच माजी नगरसेवक येत्या पाच तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ठाकरे गटामधून माजी पाच नगरसेवक भाजपमध्ये जात आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

तर दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये मागील अडीच वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सहभागी आहे. आता पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजप जाणार असल्यामुळे, आगामी पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान जागा वाटपाच गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या पाच माजी नगरसेवकांना भाजपकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू रंगली आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर या सर्व राजकीय घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील शिवसेनेमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहण्यास मिळत आहे.

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
jitendra awhad talk on Constitution, jitendra awhad on Amit Shah, Amit Shah, jitendra awhad latest news,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!

आणखी वाचा-‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा

त्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, मागील अडीच वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या, त्यामध्ये सर्वाधिक लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय ठरली आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला. यामुळेच राज्यात महायुतीच सरकार आलं आहे. हे कोणीही विसरता कामा नये, त्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम केले आणि महायुतीचा धर्म देखील पाळला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत होणार्‍या पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना ‘धनुष्यबाण’च्या वाट्याला ज्या जागा दिल्या होत्या त्या आमच्या वाट्याला मिळाव्यात, महायुतीमध्ये शिवसेनेला ३५ ते ४० जागा मिळाव्यात, पण लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीमधील त्या त्या पक्षाच्या जागा कायम ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तोच जागा वाटपाचा फॉर्म्युला, पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान देखील राहावा, अशी आमची मागणी महायुतीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का, पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर

तसेच ते पुढे म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान पुणे शहरात शिवसेनेची ताकद सर्वांना दिसून आली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेशिवाय महापौर होऊ शकत नाही अशी भूमिका मांडत,भाजप नेतृत्वाला नाना भानगिरे यांनी इशारा दिल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Story img Loader