माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे चार अध्यासनांची स्थापना करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (राजकीय तत्त्वज्ञान), गोपाळ कृष्ण गोखले (नीतिमूल्याधिष्ठित राज्यकारभार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सामाजिक न्याय) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (सार्वजनिक वक्तृत्वकला) या नेत्यांच्या नावाने ही अध्यासने स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.
या चारही नेत्यांच्या विचारांचा व कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर त्याचा परिणाम व्हावा, अशी कराड यांनी अध्यासनाची भूमिका मांडली. या वेळी तुषार गांधी, दीपक टिळक, अॅड. सुनील गोखले, अंजली मायदेव-आंबेडकर, देवेन्द्र फडणवीस, अरविंद गोखले, किरण ठाकूर, मिलिंद कांबळे, श्रीकांत भारतीय, व्ही. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader