लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कात्रज भागातील गुजर वस्ती परिसरात चार भटके श्वान मृतावस्थेत सापडले. भटक्या श्वानांना अन्नातून विषारी औषध दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत प्रीती निवास पवार (वय ४१. रा. गुजर वस्ती, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला; देशभरात पुढील पाच दिवस पावसाचे
प्रीती पवार प्राणीप्रेमी आहेत. भटके श्वान मृतावस्थेत सापडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पवार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. भटक्या श्वानांना अन्नातून विषारी ओैषध दिल्याचा संशय पवार यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.