पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा अशी आमची आग्रही मागणी आहे. जागा न सुटल्यास आम्ही भाजपचे काम करणार नाही. आमच्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी दिला आहे. तसेच मागील चार निवडणुकीत पराभूत झालेल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.

माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. प्रशांत शितोळे म्हणाले, की शहराच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाला मी-मी वाटत आहे. मतदारसंघ आमचा-तुमचा असे काही नसते. ज्या पक्षाचा आमदार, त्याला जागा असे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यातून मार्ग काढून चिंचवडची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीचा आमच्यासमोर पर्याय आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आम्ही चांगला उमेदवार देणार आहोत. नवखा चेहरा देणार आहोत. या जागेवर आमचा हक्क आहे. पुढील दिशा ठरविण्याची वेळ आली तर ठरवू शकतो. पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राजकारणात नवखे असलेलेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आम्ही तर अनुभवी, जुने आहोत. आणखी २० माजी नगरसेवक सोबत आहेत. मागील चार निवडणुका लढलेल्या त्याच त्या चेहऱ्यांना अपयश येत असेल तर चेहरा बदलला पाहिजे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

हे ही वाचा…पिंपरी : तिजोरी ‘साफ’ केल्यानंतर आता यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईसाठी नियमावली

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आम्ही २० माजी नगरसेवक एकत्र आलो आहोत. आमची दिशा ठरली असून त्यानुसार पुढे जाणार आहोत. आमची बांधणी झाली आहे. पर्याय भरपूर आहेत. अजित पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. भाजपमध्ये मोठी धुसफूस आहे. जागेसाठी आग्रही आहोत. जागा नाही मिळाली तर सर्व पर्याय खुले आहेत. अजित पवार यांनी मनधरणी केली तरी थांबणार नाही. महायुतीतून बाहेर पडणार आहोत. शहराध्यक्षही निवडला जात नाही. अशा सर्व गोष्टींविरोधात बंड केले जात असल्याचे माजी नगरसेवक कलाटे यांनी सांगितले. तर, अजित पवारांची साथ सोडणार नाही. पण, भाजपचे काम करणार नाही. भाजपचे दहा ते बारा नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा माजी नगरसेवक भोंडवे यांनी केला