पुणे : सिंहगड रस्ता भागातील भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना धमकावणाऱ्या चौघांना पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले.गणेश पांडुरंग चोरगे (वय २३, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता), करण अर्जुन दळवी (वय १९), मनोज नागराज कट्टीमणी (वय २१, रा. भैरवनाथनगर, किरकिटवाडी, सिंहगड रस्ता), दिनेश लक्ष्मण ढवळे (वय २३, रा. सावित्री अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोरगे, दळवी, कट्टीमणी, ढवळे सिंहगड रस्त्यावरील खाद्यपदार्थ, भाजीपाला विक्रेते, तसेच व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळलत होते. त्यांना पुणे शहर, परिसरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, मीनाक्षी महाडिक, स्मिता चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केला होता. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. चौघांना पुणे शहर, जिल्ह्यातनू वर्षभरासाठी तडीपार करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four goons extorting money from vendors in sinhagad road area pune print news rbk 25 amy
Show comments