राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करणाऱया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. चौघांनाही गुरुवारी पोलिसांनी अटक केली. आशिष साबळे, अभिषेक थिटे, सचिन काटकर, रणजित ढगे अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने चौघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री नगरमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी हल्ला केला होता. राज्यात विविध ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयांवर हल्ला केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांचे फलकही जाळण्यात आले. मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध नगरसह अन्य ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader