पिंपरी- चिंचवड मध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. होमा प्रिंटिंग प्रेस ची बस तमन्ना सर्कल वरून रेजवान च्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण १५ जण होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या हिंजवडी मध्ये होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कल वरून रिजवान च्या दिशेने जाणाऱ्या बस ने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन ती सिमेंट च्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यातून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader