पिंपरी: बनावट कागदपत्रे बनवणा-या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने पर्दाफाश केला. दाम्पत्यासह चार जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी येथे करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवराज प्रकाश चांभारे – कांबळे (वय ४०), स्वाती शिवराज चांभारे – कांबळे (वय ३६) या दाम्पत्यासह धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय २४, तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय २३, रा. आल्हाटवाडी, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा… भुजबळांना पडली दौंडमधील ‘केडगाव पॅटर्न’ची भूरळ; उद्या घेणार इंदापुरात सभा… जाणून घ्या केडगाव पॅटर्न आणि सभेमागील गुपित

आरोपी शिवराज आणि स्वाती यांचे कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या नावाने दुकान आहे. तिथे त्यांचे अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे त्यांनी नागरिकांना भासवले. त्यांच्या दुकानातून नागरिकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. आधारकार्डसह विविध शासकीय कागदपत्रांमध्ये अनधिकृतपणे बदल केले. याबाबत पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शिवराज, स्वाती आणि त्यांच्या दुकानात काम करणारे अन्य दोन आरोपी यांना ताब्यात घेतले.

आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी आधार कायदा २०१६ नुसार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four persons including the couple were arrested for making fake documents through illegal aadhar card seva kendra pimpri pune print news ggy 03 dvr