पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटांनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. याप्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कंत्राटी भरतीत भ्रष्टाचाराचा लवकरच भांडाफोड करणार

हेही वाचा – पिंपरी: स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगतापांच्या स्वीय सहाय्यकाचा शरद पवार गटात प्रवेश!

रविवारी रात्री अकराच्या सुमारास ताथवडे या ठिकाणी कॅप्सूल टँकरमधून कमर्शियल गॅस टाक्यांमध्ये अवैध गॅस भरण्यास सुरू असताना भीषण असे नऊ स्फोट झाले. यामुळे अवघ्या पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली होती. काही किलोमीटरवरून स्फोटाचा आवाज आणि धुरांचे लोट दिसले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचबरोबर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीदेखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. तातडीने याप्रकरणी तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत तंबी दिली होती. त्यानंतर काही तासांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four police suspended in connection with nine blasts in pimpri chinchwad including two officers kjp 91 ssb