पिंपरी : विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार पथके नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोडीला चाप बसणार आहे. भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीतील आठ झाडे; तसेच संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्याची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी वृक्ष तोडण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : उच्च शिक्षण संचालकांच्या आदेशाला विद्यापीठांकडून केराची टोपली

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
additional commissioner of pcmc on Fire At Unauthorized Scrap Shops
पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Municipal Corporation files case against two people for putting up illegal hoardings in Pimpri Pune print news
पिंपरी: बेकायदा फलक लावणाऱ्या दाेघांवर गुन्हे; ४६ हजारांचा दंड वसूल

बांधकाम, जाहिरात फलकांसाठी शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खासगी जागेसह महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. वृक्षतोडीच्या घटना रोखण्यासाठी उद्यान विभागाची चार स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके आपापल्या भागाची पाहणी करणार आहेत. वृक्षतोडीतचे प्रकार आढळल्यास त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सारथी हेल्पलाइनप्रमाणे स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

Story img Loader