जेजुरी वार्ताहर
आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलाचा आई आणि तिच्या प्रियकरांने गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे प्रेत पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिले.ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
हत्या झालेल्या मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार (वय 4) असून त्याची आई रेणू शंकर पवार (वय 20) आणि तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके (वय 21 )दोघेही रां मोडलींब. ता.माढा जी.पुणे या दोघांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
हे पण वाचा- लिव्ह-इन पार्टनर तरुणीची डोक्यात कूकर घालून केली हत्या; बंगळुरूतला धक्कादायक प्रकार!
पोलिसांनी काय माहिती दिली आहे?
या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते.या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला.खून केल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर आणून ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले. या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती .त्यानुसार जेजुरी पोलिसांनी बारकाईने तपास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत.
हे पण वाचा- पती व सासूची गर्भवती महिलेला जबर मारहाण; नवजात बाळ दगावले
या दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे अधिक तपास करीत आहेत.