पिंपरी- चिंचवडसह महाराष्ट्रात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणपती बाप्पांना पाणवलेल्या डोळ्यांनी गणेश भक्तांनी निरोप दिला. अशात पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील वय चार वर्ष राहणार मंत्रा सोसायटी मोशी या ठिकाणी काल सायंकाळी घटना घडली आहे. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला आहे. हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

आणखी वाचा-आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे! श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी

Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

पिंपरी- चिंचवड शहरामध्ये गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने विसर्जन पार पडलं. असं असलं तरी पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अर्णव या चार वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंत्रा सोसायटीमध्ये गणपती बसवण्यात आला होता. त्याचं विसर्जन काल गुरुवारी सायंकाळी झालं. अर्णव हा त्याच्या आई- वडिलांसह या विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला. तो पाण्याच्या बाजूच्या कठड्यावर उभा होता आणि गणपती विसर्जनाचा आनंद घेत होता. अचानक तो टाकीत पडला. अर्णव दिसत नसल्याने त्याच्या आई- वडीलांनी त्याचा शोध घेतला. काही वेळाने टाकीचे क्वचित झाकण उघडे होते. त्यात पाहिले असता अर्णव त्या ठिकाणी दिसला. तोपर्यंत फार उशीर झाला होता. तातडने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मायलेकाचा तो सेल्फी ठरला अखेरचा….

अर्णवसह आई- वडील मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. अर्नवने पांढरा पोशाख घातला होता. विसर्जनादरम्यान अर्णव आणि त्याच्या आईने एक सेल्फी घेतला असून तो शेवटचा सेल्फी ठरल्याचं बोललं जात आहे. या फोटोमध्ये दोघेही अत्यंत आनंदी दिसत असून या घटनेमुळे अर्णवच्या आईवर दुःख चा डोंगर कोसळला आहे.