पुणे : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे (एमआयडीसी) २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेली सरळसेवा भरती प्रक्रिया करोना प्रादुर्भावासह विविध कारणांनी रखडली होती. मात्र आता चार वर्षांनी ही पदभरती रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले असून या परीक्षेसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेले ५०० रुपये परीक्षा शुल्क परत देण्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक एमआयडीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत गट क आणि गट ड मधील एकूण १४ संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातील ५०२ पदे ही ऑनलाइन परीक्षेद्वारे तर ३६३ पदे ऑफलाइन परीक्षेद्वारे भरली जाणार होती. ५०२ पदांसाठी २० ऑगस्ट २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेऊन १५ डिसेंबर २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यातील लघुलेखक संवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी ३० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
arvi assembly constituency bjp dadarao yadavrao keche withdraws from the maharashtra assembly election 2024
Arvi Assembly Constituency : आर्वीत अखेर केचेंची माघार, म्हणतात माझा पक्षाला लाभच होणार
Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray
Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
union bank job
नोकरीची संधी: युनियन बँकेत अधिकारी पदाची संधी
Financial and Cyber Crimes Branch reported that Deepak Sakharam Kulkarnis seized assets remain unreleased
जप्त केलेली कोणत्याही मालमत्ता मुक्त करण्यात आलेली नाही, डीएसके प्रकरणात आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेची न्यायालयास माहिती

हेही वाचा : महत्त्वाची बातमी : पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या उद्या रद्द

मात्र, त्यानंतर आवश्यक असलेली व्यावसायिक परीक्षा होऊ शकली नाही. अखेरीस ही परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्यात येत असल्याचे एमआयडीसीने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. वाहनचालक, शिपाई, मदतनीस, अग्निशमन विमोचक, यंत्रचालक, चालक (अग्निशमन), वीजतंत्री ग्रेड २, मदतनीस अशा पदांची भरती रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : फेसबुकवरील मैत्रिणीला भेटायला हॉटेलवर गेला अन् जाळ्यात अडकला; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला विचित्र प्रकार

भरती प्रक्रिया रद्द करण्यामागे आकृतीबंध अंतिम नाही, महापरीक्षा संकेतस्थळाचा शासन निर्णय अधिक्रमित होणे, परीक्षा घेण्यासाठीच्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित होणे अशी कारणे देण्यात आली आहेत. मात्र भरती प्रक्रिया रद्द करताना उमेदवारांनी परीक्षांसाठी भरलेल्या शुल्काच्या परताव्याबाबत परिपत्रकात स्पष्टता देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी प्रत्येकी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरले होते. त्यामुळे चार वर्षे प्रतीक्षा करून पदभरती रद्द आणि शुल्क परताव्याचीही स्पष्टता नाही, अशी उमेदवारांची कोंडी झाली आहे.