पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ.विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले आहे.

ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर डॉ. भामरे यांच्याजागी सप्टेंबरमध्ये प्रमुख डॉ.किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ दूर करीत सुसूत्रता आणली होती. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी वक्तशीरपणा आणि शिस्तीचे पाऊल उचलले होते. याबद्दलही अनेक जण त्यांच्यावर नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
Hearing on Place of Worship Act to be held in new bench Six petitions filed by Hindutva organizations
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी नव्या खंडपीठाकडे; हिंदुत्ववादी संघटनांकडून सहा याचिका दाखल
anti-corruption awareness phrases, Circular of Charity Commissioner, High Court,
भ्रष्टाचाराविरोधी जागरूकता करणाऱ्या वाक्यांच्या वापरास मनाई ? धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाकडून रद्द

हेही वाचा… देशातील प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांना परदेशांत मागणी

डॉ.अजय तावरे हे आधी अधीक्षकपदी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी तावरे यांची मागील वर्षी एप्रिलमध्ये या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची या प्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात आली होती. याचबरोबर डॉ. तावरे हे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे एक पूर्णवेळ जबाबदारी असताना वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आता देण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे दोन पूर्णवेळ जबाबदाऱ्या सोपविणे चुकीचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

आदेश निघण्याआधीच पदभार स्वीकारला?

वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ.तावरे यांची नियुक्ती करण्याचा आदेश अधिष्ठाता डॉ.काळे यांनी शुक्रवारी (ता.२९) काढला. मात्र, डॉ.तावरे यांनी या पदाचा कार्यभार त्याआधीच गुरुवारी (ता.२८) रात्री उशिरा स्वीकारला. विशेष म्हणजे डॉ. जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांनी हा पदभार स्वीकारला, अशी चर्चा ससूनमध्ये रंगली आहे.

Story img Loader