महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी ४५ निरीक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागातील जागा कायम स्वरूपी पद्धतीने भरण्यासाठी सरळ सेवा पद्धती राबविली जात आहे. त्याअंतर्गत परीक्षाही झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असल्याने कंत्राटी पद्धतीने अतिक्रमण निरीक्षकांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.कंत्राटी पद्धतीने अतिक्रमण निरीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार चार पात्र निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यातील सर्वांत कमी म्हणजे ९५ लाख १२ हजार ३७ रुपयांची निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली.