पिंपरी- चिंचवड ही स्मार्ट सिटी आहे. पिंपरी- चिंचवड शहराला मिनी इंडिया देखील म्हटले जाते. कारण या शहरांमध्ये देशभरातील नागरिक वास्तव्यास आहेत. शहरातील दिवसेंदिवेस बांधकाम, इमारती वाढत जात आहेत. असं असलं तरी यामधून अनेक फ्लॅट धारकांची फसवणूक होत असलेल्या तक्रारी दररोज पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. अशीच एक तक्रार पिंपरीतील नामांकित बिल्डरच्या विरोधात दाखल झाली आहे. फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पिरॅमिड डेव्हलपर्स बिल्डर खेमचंद उत्तमचंद भोजवानी, पिरॅमिड डेव्हलपर्स यांचे भागीदार, प्रथम डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार आणि गृहप्रकल्पाच्या जमिनीचे मालक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दयानंद रवाळनाथ पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे, पण विद्यार्थीच मिळेनात; शिष्यवृत्तीचे निकष, नियमांमध्ये बदल करण्याची वेळ

अद्याप आरोपी मोकाट असून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर खेमचंद उत्तमचंद भोजवानीने तक्रारदार यांना फ्लॅट देताना खरेदीखतामध्ये ठरवून दिलेल्या नियम आणि अटी प्रमाणे आणि ॲमेनिटीज न देता बँकवेट हॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट बांधून देण्याचं आश्वासन आरोपी बिल्डर ने दिले होते. त्यासाठी इतर फ्लॅट धारकाकडून रक्कम घेतली असताना ॲमेनिटीज दिल्या नाहीत. तसेच, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झालेल्या ठिकाणी न करीता दुसऱ्या ठिकाणी केला आहे. बिल्डरने  देखभाल खर्च  म्हणून प्रत्येक फ्लॅटधारकडून दोन वर्षांसाठी सुमारे ५० हजार घेतले असून सोसायटी हॅन्ड ओव्हर केली आहे. मात्र, प्रत्येक फ्लॅट धारकाकडून घेतलेल्या रकमेचा हिशोब दिला नाही. ऍग्रिमेंट प्रमाणे फ्लॅट चा ताबा दिला नाही. तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून दिलेले नाही. सोसायटी नोंद झाली असली तरी जमीन आणि इमारत सोसायटीला हस्तांतरित केलेली नाही. अस तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात ४२० सह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट सन १९६३ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ३ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ द नुक हौसिंग सोसायटी, ताथवडे येथे घडला आहे. १४ जानेवारी २०२४ रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.