पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन कर भरणा होत नसल्याने महापालिकेच्या कस्टमर केअर क्रमांक समजून निराळ्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर सायबर भामट्यांनी दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महंमदवाडीतील एका नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बँकेतील नोंदीनंतर तो सात महिन्यांनी निदर्शनास आला. या नागरिकाच्या मुलीने मोबाईलवरुन त्यांच्या पत्र्याच्या शेडचा मिळकत कर पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर भरला. त्यानंतरचा कर भरणा होण्यात अडथळा निर्माण झाला होता. तेव्हा तिने इंटरनेटवरून कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला. तेव्हा तेथील व्यक्तीने त्याने एक अॅप डाऊन लोड करायला सांगितले. त्यांनी ते डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये परस्पर काढून घेतले. कोंढवा पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
पुणे महापालिकेचा करभरणा करताना दीड लाखांची फसवणूक
या नागरिकाच्या मुलीने मोबाईलवरुन त्यांच्या पत्र्याच्या शेडचा मिळकत कर पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर भरला
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-07-2022 at 14:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of 1 5 lakhs while paying taxes of pune municipal corporation pune print news zws