लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चऱ्होलीतील श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमताने एक कोटी २५ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी व्यवस्थापकांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०१७ ते २०२२ दरम्यान घडलेल्या या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Man robbed near Pune railway station
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार

या बाबत लेखा परीक्षक संतोष शंकर पाटोळे (वय ४९, रा. वाघोली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतसंस्थेचे व्यवस्थापक शरद नरहरी ढमढेरे, अध्यक्ष देविदास सोपान भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण फुले, संचालक भगवान ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब किसन पवार, प्रवीण पोपटराव काळजे, ज्ञानेश्वर काळुराम पठारे, संतोष सोपान रासकर, भाऊसाहेब वसंत भोसले आणि तीन महिला संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-विरोधकांकडून कंत्राटी भरतीचा बागुलबुवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका

व्यवस्थापक ढमढेरे आणि एका महिला संचालकाने २७ लाख ९५ हजार रुपये कॅशबुक आणि बचत खात्यामधील रोख ९७ लाख अशा एक कोटी २५ लाखांचा संगनमताने अपहार केला. ठेवीदारांनी विश्वासाने दिलेल्या ठेवींचा आणि रकमांचा गैरव्यवहार होत असताना इतर आरोपींची दैनंदिन व्यवस्थापन पाहणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अपहार झाल्याने संस्थेस कर्जवाटपास निधी शिल्लक राहिला नाही. संस्थेची तूट वाढत गेली. संस्थेत जमा झालेल्या निधीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी संचालक मंडळ पार पाडू शकले नाही. त्यामुळे संचालक मंडळ सामूहिकरीत्या या अपहाराला जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader