गुंतवणुकीच्या आमिषाने मित्राची दहा लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुणे: बहुपडदा चित्रपटगृह चालकांना दिलासा; करमणूक कर वसुलीचा दावा निकाली
या प्रकरणी ओपिंदरसिंग प्रादानसिंग कांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष वसंत खराडे (वय ६५, रा. भोसलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खराडे आणि कांत महाविद्यालयापासून मित्र आहेत. कांत यांनी खराडे यांना एका कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर खराडे यांनी पैसे गुंतवले. गुंतवणुकीवर परतावा न दिल्याने खराडे यांनी कांत यांच्याकडे विचारणा केली. कांत यांनी त्यांना दोन धनादेश दिले. खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत.
खराडे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची चौकशी करुन कांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करत आहेत.