लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: बांधकामासाठी महापालिकेच्या परवानग्या मिळवून देण्याचे आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची ५१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम व्यावसायिकाकडे आरोपींनी साडेतीन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शफी पठाण आणि समीर पठाण (रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून कोंढव्यातील पारगेनगर भागात गृहप्रकल्पाचे काम सुरु होते. आरोपी पठाण यांनी बांधकामाची तक्रार महापालिकेकडे करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपींनी स्वत:चा वाढदिव, तसेच महिला दिनी साडी वाटप कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे उकळले.
आणखी वाचा- पुणे मेट्रोच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची अखेर चौकशी
महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्या मिळवून देतो, तसेच महापालिकेत केलेला तक्रार अर्ज मागे घेतो, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडून पठाण यांनी वेळोवेळी ५१ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडे साडेतीन लाख रुपयांची खंडणी मागितली. बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.