लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात मुलांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला मित्राने पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा >>>प्रकरणी पुणे : वाहतूक नियमनाऐवजी दंड वसुली करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित
अनिल हिरामण चंद्रमाेरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शिवकुमार वाजपेयी (वय ६०, रा. केटीए अपार्टमेंट, बोपोडी) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चंद्रमाेरे हा वाजपेयी यांचा वर्गमित्र आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात चार रिक्तपदावर भरती होणार आहे, अशी बतावणी चंद्रमोरेने वाजपेयी यांच्याकडे केली होती. वाजपेयी यांच्या मुलाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात नोकरी लावण्याचे आमिष चंद्रमोरेने वाजपेयी यांना दाखविले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ७७ हजार २०० रुपये घेतले.
वाजपेयी यांच्या मुलाला नाेकरी लावून दिली नाही. वाजपेयी यांनी याबाबत चंद्रमोरेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाजपेयी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत.