लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा पैसे देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीच्या घटना समोर येत असून पाच जणांची तब्बल एक कोटी ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवित सायबर चोरटे नागरिकांना गंडा घालत आहेत. या फसवणुकीपासून सावध राहत आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नफा देण्याचे आमिषाने फसवणूक
मोठ्या कंपन्याचे शेअर आणि आयपीओ खरेदी आणि विक्री केल्यानंतर अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १७ जुलै ते ९ सप्टेंबर या काळात घडला.
सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाला फोन करून आपण एसबीआय सिक्युरिटीज स्टॉक कंपनीचे एजंट आहेत, असे सांगितले. त्यांनी तक्रारदाराला एसबीआय सर्व्हिस ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराला एक लिंक पाठवून एसबीआय सिक्युरिटीजचे मोबाइल ॲप डाउनलोड करायला लावले. या ॲपमधून विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी विक्री केल्यावर जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदाराला गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपींनी सुरुवातीला तक्रारदाराला तीस हजार रुपये नफा झाल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर अनेक कारणे सांगून त्यांनी तक्रारदाराला विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले.
आणखी वाचा-भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात ५६ लाखांची अफू जप्त
शेअरच्या आमिषाने ७७ लाखांची फसवणूक
शेअर बाजारातून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने ७७ लाख ५० हजार ७५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील मिनाक्षी पूरम सोसायटीमध्ये राहणार्या एका ४३ वर्षीय सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. ही घटना १० मे ते २६ जुलै २०२४ या काळात घडली.
सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला संपर्क साधून शेअर बाजारात ट्रेडिंगद्वारे चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला मोबाइलमध्ये एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तसेच, गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. तक्रारदाराने एकूण ७७ लाख ५० हजार ७५४ रुपये पाठवले. मात्र, गुंतवलेली रक्कम आणि परतावा काहीच न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.
ट्रेडिंग टास्कद्वारे १२ लाखांची फसवणूक
फेसबुकवरील एका पोस्टद्वारे ट्रेडिंगमध्ये नफा कमाविण्याचे आमिष दाखवून एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला व्हॉट्स अप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ट्रेडिंग टास्क दिला. त्यात पैसे गुंतवणूक करण्यास सांगून अधिक मोबादला देण्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराने पैसे गुंतवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा मात्र मिळाला नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
आणखी वाचा-आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका;‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकासाला गती- मोदी
नफा झाल्याचे भासवून तरुणीची फसवणूक
ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची २४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोहगाव परिसरात राहणार्या २९ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीला ऑनलाइन लिंक पाठवून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तरुणीने त्यात पैसे गुंतवले. त्यानंतर भरघोस नफा मिळत असल्याचे भासवून, ते पैसे काढण्यासाठी शुल्क लागेल, असे सांगून तरुणीला विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यास भाग पाडले.
क्रेडिट कार्ड कॅश बॅकच्या आमिषाने फसवणूक
क्रेडिट कार्ड कॅश बॅकच्या आमिषाने तरुणीची १७ लाख १० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एरंडवणे भागात राहणार्या २६ वर्षीय तरुणीने अलंकार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १० ते ११ एप्रिल २०२४ या दरम्यान घडली. सायबर चोरट्याने तरुणीला बँकेचा प्रतिनीधी बोलत असून क्रडिट कार्ड कॅश बॅक देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.