लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नादीर अब्दुल हुसेन अली नईमाआबादी (वय ४०), सीमा नादीर नईमाआबादी (वय ३५, दोघे रा. लष्कर), मौलाना शोएब मैनुद्दीन अत्तार (वय ३५), माजीद उस्मान अत्तार (वय ५०), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय ४०), इरम शोएब अत्तार (वय ३२, सर्व रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा रास्ता पेठेत पादत्राणे विक्री व्यवसाय आहे.

आणखी वाचा-हुश्श!… ‘राष्ट्रवादी’ चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

आरोपींनी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडे सौदी अरेबियातील मक्का येथे व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखविले होते. आरोपी नईमाआबादी, मौलाना अत्तार यांनी त्यांना व्यवसायाबाबतची कागदपत्रे दाखविली होती. मौलाना अत्तार याने ताईत तयार करण्यासाठी व्यावसायिकाकडून २५ हजार रुपये घेतले होते. आरोपींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने तक्रारदाराकडून वेळोवेळी ९० लाख ७५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, अपहार तसेच अनिष्ट, अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे तपास करत आहेत.