लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या परिचितांना त्याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले. दहा लाख रुपये दिल्यानंतर राजगुरुने नोकरी लावली नाही.

आणखी वाचा-पिंपरीत चंद्रकांत पाटील यांनी हात का जोडले? वाचा सविस्तर…

त्यानंतर राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटायला बोलावले. तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader