मुख्यमंत्री कार्यालयातून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून एकाने ससून रूग्णालयातील रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी ससून रूग्णालयात डॉक्टर असून २२ ऑगस्ट रोजी कामावर होते. त्यावेळी एकाने दूरध्वनी करून मी ‘सीएमओ’मधील डॉक्टर बोलत असल्याची बतावणी केली. त्याशिवाय ससूनमध्ये दाखल रूग्णांच्या नातेवाईकांना लवकर रूग्णवाहिका मिळवून देण्यासाठी ६ हजार ३०० रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली.
तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना बदली न करण्यासाठी पैशांची मागणी करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करीत आहेत.