वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणुकीचे सत्र कायम असून सायबर चोरट्यांनी एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती. वीज बिल भरले नाही.
हेही वाचा >>>कुक्कुटपालकांच्या समस्यांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
आज रात्री नऊ वाजेपर्यंत बील न भरल्यास वीज कापण्यात येईल, अशी धमकी चोरट्याने महिलेला दिली.महिलेने चोरट्याच्या बतावणीवर विश्वास ठेवला. चोरट्याने महिलेला टिम व्ह्युअर नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने ॲप डाऊनलोड केल्यानंतर तिच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने लांबविली. या माहितीच्या गैरवापर करुन चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून एक लाख रुपयांची रोकड लांबविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
हेही वाचा >>>पुणे: फेरीवाला समिती निवडणुकीतील अंतिम मतदारयादीत परस्पर कपात?; महापालिका प्रशासन-पथारी संघटना आमने सामने
बतावणीवर विश्वास ठेऊ नका
शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीज कापण्याची भिती घालून फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवणारे तक्रारदार जाळ्यात सापडतात. चोरट्यांनी ॲप डाऊनलोड करण्यास सांगितल्यानंतर मोबाइलमधील सर्व माहिती चोरट्यांकडे जातात. बँक खात्याला मोबाइल क्रमांक जोडलेला असल्याने चोरटे या माहितीचा गैरवापर करुन बँक खात्यातून पैसे लांबवितात. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरण आणि पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.