लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने एकाची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने लष्करात नोकरी मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्र दिले असून, अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी

गणेश बाबुलाल परदेशी (रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत कोंढवा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे कोंढवा भागात दुकान आहे. आरोपी परदेशी तक्रारदाराच्या दुकानात जायचा. त्यांची ओळख झाली. त्याने विधान भवनात कामाला असल्याची बतावणी तक्रारदाराकडे केली.

आणखी वाचा-बी. टी. कवडे रस्ता उड्डाणपूल परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग

लष्करातील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करुन तक्रारदाराच्या दोन मुलीना लष्करात कायम स्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष परदेशीने दाखविले. मुलींना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी पाच लाख रुपये ऑनलाइन, तसेच रोख पद्धतीने परदेशीला दिले. तक्रारदाराच्या ओळखीतील काहीजणांना त्याने लष्करात नोकरीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून त्याने पैसे घेतले.

परदेशीने त्यांना गॅरिसन इंजिनिअरिंगचे बनावट नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर तक्रारदाराने चौकशी केली. तेव्हा नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. परदेशीने तक्रारदारास आणखी काहीजणांची फसवणूक केली असून, आतापर्यंत नोकरीच्या आमिषाने आठ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.