लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: आंध्र प्रदेशातील सूत गिरणीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील एका उद्योजकाची एक कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सन्नाप्पा मुदप्पा बंदिकी (रा. आदोनी, जि. कर्नुल, आंध्र प्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका उद्योजकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंदिकी आणि तक्रारदार उद्योजकाच्या वडिलांचा परिचय होता. तक्रारदारच्या वडिलांना आंध्र प्रदेशातील संगिता कॉटन सूत गिरणीत गुंतवणुकीचे आमिष बंदिकी याने दाखविले होते. सूत गिरणीत व्यवसायत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल,असे आमिष दाखविले होते. तक्रारदाराच्या वडिलांनी बंदिकीला एक कोटी नऊ लाख रुपये वेळोवेळी दिले.

आणखी वाचा- पिंपरी- चिंचवडमध्ये मध्यरात्री नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद; तीन कोयते जप्त

दरम्यान, उद्योजकाच्या वडिलांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर उद्योजकाने बंदिकी याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा बंदिकीने त्यांना परतावा तसेच मूळ मुद्दल देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with pune businessman of rs 1 crore with the lure of investing in a yarn mill in andhra pradesh pune print news rbk 25 mrj