लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. सराफी पेढीतील ८४ हजारांची सोनसाखळी चोरून चोरटा पसार झाला.
याबाबत एका सराफ व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार सराफ व्यावसायिकाची कर्वेनगर सराफी पेढी आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांसारखी टोपी घातलेला चोरटा सराफी पेढीत आला. त्याने सराफ व्यावसायिकाकडे पोलीस असल्याची बतावणी केली. सोनसाखळी दाखविण्यास सांगितले. सोनसाखळी गळ्यात घातली. त्यानंतर खिशातून पाकिट काढून सराफ व्यावसायिकाला दिली. पाकिटावर ५० हजारांची रोकड असे लिहिले होते. त्यानंतर दोन मिनिटात आलो, असे सांगून चोरटा पेढीतून बाहेर पडला.
आणखी वाचा-बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई
सराफ व्यावसायिकाने चोरट्याने दिलेले पाकिट उघडून पाहिले. तेव्हा पाकिटात पैशांऐवजी वृत्तपत्रातील एक पुरवणी घडी घालून ठेवल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटीत तपास करत आहेत.