लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : पादचारी ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध दाखल केला.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांची विवाहित मुलगी प्रभात रस्ता परिसरात राहायला असून, त्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. शनिवारवाडा परिसरातील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाजवळ चोरट्याने त्यांना अडवले. तुमची वस्तू रस्त्यावर पडली आहे का ?, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. महिलेने चोरट्याकडे दुर्लक्ष केले.

आणखी वाचा-पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

काही अंतरावर चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने त्यांना अडवले. त्यांना सोन्यासारख्या धातूची पट्टी चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. स्वस्तात सोन्याची पट्टी देतो, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडील मंगळसूत्र आणि ५०० रुपये काढून घेतले. चोरटे तेथून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करत आहेत.