पुणे : महापालिकेने काही खासगी रुग्णालयांना ०.५ जादा चटई क्षेत्र दिले. त्यापोटी या रुग्णालयांनी महापालिकेने शिफारस केलेल्या गरीब रुग्णांना मोफत रुग्णशय्या (बेड) उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. असे असताना या रुग्णालयांकडून गरीब रुग्णांना मोफत रुग्णशय्या देण्याचे प्रमाण नगण्य असल्याची बाब समोर आली आहे. यात रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन), इनलॅक्स बुधरानी के.के.आय इन्स्टिट्यूट या रुग्णालयांचा समावेश आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांना माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या उत्तरातून हे वास्तव समोर आले आहे. पुणे महापालिकेने रूबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) आणि इनलॅक्स बुधरानी के.के.आय इन्स्टिट्यूट यांना ०.५ जादा चटई क्षेत्र दिले होते. त्यापोटी त्यांनी महापालिकेने शिफारस केलेल्या गरीब रुग्णांना मोफत रुग्णशय्या देणे आवश्यक आहे. त्यात रुबी हॉलने १२, सह्याद्री ५ आणि के.के.आय इन्स्टिट्यूटने २ अशा १९ रुग्णांना मोफत रुग्णशय्या देणे अपेक्षित आहे. त्यामुळे दरवर्षी ६ हजार ९३५ गरीब रुग्णांवर या रुग्णांवर उपचार करायला हवेत.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना

हेही वाचा >>> राज्यात लवकरच आदिवासी विद्यापीठ

प्रत्यक्षात या रुग्णालयांनी अगदी मोजक्या रुग्णांना मोफत रुग्णशय्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात रूबी हॉलने एप्रिल २०२२ – मार्च २०२३ , एप्रिल २०२३- मार्च २०२४ या दोन वर्षांत मिळून ४९ तर यंदा एप्रिल ते जून दरम्यान ७ रुग्णांवर उपचार केले. सह्याद्री हॉस्पिटलने एप्रिल २०२२ – मार्च २०२३ , एप्रिल २०२३- मार्च २०२४ या दोन वर्षांत मिळून ४० तर यावर्षी यंदा एप्रिल ते जून दरम्यान १० रुग्णांवर उपचार केले. के. के. आय इन्स्टिट्यूटने एप्रिल २०२२ – मार्च २०२३ , एप्रिल २०२३- मार्च २०२४ या दोन वर्षांत मिळून ५१ तर यावर्षी यंदा एप्रिल ते जून दरम्यान २ रुग्णांना या सवलतीचा लाभ दिला, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा >>> राष्ट्र्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची रणधुमाळी सुरू; इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविले

याबाबत विवेक वेलणकर म्हणाले की, नागरिकांना या योजनेची माहिती नाही आणि आरोग्य विभाग ती पोहोचविण्याचा प्रयत्नही करीत नाही. गरीब व गरजू रुग्ण म्हणजे फक्त दारिद्र्य रेषेखालील (वार्षिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा कमी) ही व्याख्या महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याचा हा परिणाम आहे. वार्षिक तीन लाख उत्पन्न मिळवणारेही गरीब व गरजू असतात. मोफत उपचारांसाठी उपलब्ध रुग्णशय्या वाया घालवण्यापेक्षा त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या तर अनेक गरजूंना फायदा होईल.

औंधमधील ‘एम्स’मध्ये कमी रुग्ण

औंधमधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयातील १० टक्के रुग्णशय्या महापालिका पाठवेल त्या रुग्णांसाठी मोफत राखीव ठेवण्याचा करार २०१३ मध्ये करण्यात आला. मात्र एप्रिल २०२२ – मार्च २०२३ , एप्रिल २०२३- मार्च २०२४ या दोन वर्षांत मिळून २२ तर यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान २ रुग्णांना या सवलतीचा लाभ मिळाला. त्यामुळे हे रोज गरजू व गरीब रुग्ण मोफत उपचारापासून वंचित राहात आहेत.

शहरी गरीब रुग्णांना या खासगी रुग्णालयांनी मोफत रुग्णशय्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या रुग्णालयांकडून गरीब रुग्णांवर उपचाराचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न केले जातील. याचबरोबर या रुग्णालयांना पत्र पाठवून अशा रुग्णांची संख्या वाढविण्यास सांगितले जाईल. – डॉ. कल्पना बळिवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका