‘‘चीनबाबत मैत्रीपूर्ण धोरण ठेवण्याव्यतिरिक्त भारतापुढे सध्या पर्याय नसून सध्या भारताने स्वीकारलेले धोरण योग्य आहे. चीनबरोबरचा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी झटापट करण्यापेक्षा हा प्रश्न राहणार हे गृहीत धरून पुढे कसे जाता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे,’’ असे मत अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांनी बुधवारी व्यक्त केले.
सरहद संस्थेच्या वतीने ‘भारत-चीन संबंध’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये प्रधान बोलत होते. या वेळी सरहदचे अध्यक्ष संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले उपस्थित होते.
या वेळी प्रधान म्हणाले, ‘‘चीन आणि भारतामधील सीमाभागाचा प्रश्न हा ब्रिटिश काळापासून निर्माण झालेला आहे. या दोन्ही देशांमधील सीमांबाबत ब्रिटिशांच्या काळापासून असलेली संदिग्धता आणि चीनचे वाढणारे प्राबल्य यामुळे सीमेचा प्रश्न सोडवण्यात भारत निष्प्रभ ठरला आहे. चीनचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध करणे किंवा चर्चेचा मार्ग स्वीकारून या प्रश्नाबरोबर जगायला शिकणे असे पर्याय आहेत. चीनबाबत मैत्रीपूर्ण धोरण ठेवण्याव्यतिरिक्त भारताला सध्या पर्याय नाही. चीनचा प्रश्न गृहीत धरून अधिकाधिक सक्षम होण्याकडे भारताने लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर पूर्वाचलच्या विकासाकडेही अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा