हडपसर येथील  शेवाळवाडी मध्ये दोन तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. एकीने गळफास लावून घेतला तर तिला ॲम्बुलन्समधून घेऊन जाताना त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा >>> पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीबाबत आज मुंबईत बैठक

PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
student studying in English school at Sea Woods in navi mumbai committed suicide by jumping from the fifth floor
शाळेच्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून विद्यार्थाने केली आत्महत्या …
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या

सारिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९ रा. क्रिस्टल सोसायटीकडूनच , शेवाळेवाडी) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९रा. मराठी शाळेसमोर शेवाळेवाडी) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात  वाजण्याच्या सुमारास घडला आहे. 

हेही वाचा >>> पुणे : विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम

हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा आणि सारिका या दोघी बाल मैत्रिणी होत्या. मंगळवारी संध्यकाळी सातच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पहिले आणि तिने  त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरून उडी मारली. ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

Story img Loader