लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मित्राबरोबर दुचाकीवरुन जात असतान मोटारीला धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. दुचाकीस्वार तरुणाचा सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या मित्राला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्याला एका शाळेच्या मैदानात जखमी अवस्थेत सोडून दुचाकीस्वार पसार झाले. वेळीच उपचार न मिळाल्याने मित्राचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कृष्णा लक्ष्मण ससाणे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला रुग्णालयात उपचारसाठी दाखल न करता पसार झालेला दुचाकीस्वार मित्र संतोष नागनाथ भिसे (वय २५, रा. मार्केट यार्ड) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भिसे आणि कृष्णा ससाणे मित्र आहेत. बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे दुचाकीस्वार संतोष आणि कृष्णा हे बिबवेवाडीतील पुष्पमंगल कार्यालयासमोरुन निघाले होते. दुचाकीस्वार संतोष भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निघाला होता. समोरुन येणाऱ्या मोटारीला त्याने धडक दिली. अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार संतोष याला किरकोळ दुखापत झाली.

आणखी वाचा-सेट परीक्षेची तारीख जाहीर… परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?

दुचाकीस्वार संतोषने कृष्णाला बिबवेवाडीतील एका शाळेच्या मैदानात नेले. त्याला रुग्णालयात दाखल न करता तो त्याला तेथे सोडून पसार झाला, तसेच अपघाताची माहिती त्याचे कुटुंबीय किंवा पोलिसांना दिली नाही. दुसऱ्या दिवशी मैदानात एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला. तपासात गंभीर जखमी अवस्थेतील कृष्णाला मैदानात सोडून त्याचा मित्र संतोष पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends run away after accident serious injured young man dies pune print news rbk 25 mrj