पुणे : पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये वाढ होणार आहे. पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार देशांतर्गत ३५ ठिकाणांना पुण्याला हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. याचबरोबर पुण्यातून तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणेही होणार आहेत. हे वेळापत्रक येत्या रविवारपासून लागू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे विमानतळावरून आता देशांतर्गत ३५ ठिकाणांसाठी थेट विमानसेवा सुरू होईल. त्यात पुणे ते भोपाळ ही थेट विमानसेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. इंडिगो एअरलाईन्स कंपनी ही सेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू करीत असून, ती दररोज असेल. याचबरोबर पुणे ते त्रिवेंद्रम ही थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्स सुरू करीत आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसकडून चेन्नई आणि कोचीसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. देशांतर्गत अनेक प्रमुख शहरांना पुणे हवाई मार्गाने जोडले जाणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

हे ही वाचा… हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !

पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्येही वाढ होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्यांकडून पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमान सेवा २२ नोव्हेंबपासून सुरू होणार आहे. याचबरोबर इंडिगो एअरलाईन्सकडू पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे आता पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बँकॉकसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. सध्या सिंगापूर आणि दुबईसाठी सेवा सुरू होती. आता त्यात बँकॉकची भर पडली असून, विमानांची संख्याही वाढणार आहे, असे ढोके यांनी सांगितले.

पूर्ण क्षमतेने वापर होणार

सध्या पुणे विमानतळावरून दैनंदिन २१८ विमानांची ये-जा होऊ शकते. मात्र, या संपूर्ण क्षमतेने त्याचा वापर होत नाही. त्यामुळे दैनंदिन सरासरी १८५ ते १९० विमानांची ये-जा होते. गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा पुणे विमानतळावरून एका दिवसांत उच्चांकी २०० विमानांची ये-जा होऊ शकली होती. आता आगामी हिवाळी वेळापत्रक ३० मार्चपर्यंतचे असून, यामुळे नवीन विमान सेवा सुरू होऊन पूर्ण क्षमतेने विमानांची ये-जा होऊ शकेल आणि नवीन ठिकाणांना पुणे हवाई मार्गाने जोडले जाईल.

हे ही वाचा… ‘स्वच्छतेच्या’ मजकुरावर लाखभर ‘खर्च’ महानगरपालिकेला कोणी गंडविले?

पुणे विमानळावरील हवाई प्रवास

  • दैनंदिन प्रवासी संख्या – ३० हजार
  • दैनंदिन विमानांची ये-जा – २१८
  • आंतरराष्ट्रीय उड्डाणे – दुबई, सिंगापूर, बँकॉक

पुणे विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार आता विमान कंपन्यांना पुण्याला जास्तीत जास्त ठिकाणांशी जोडणाऱ्या सेवा सुरू करता येतील. यामुळे आगामी काळात पुणे विमानतळावरून प्रवाशांचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुकर होईल. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ