आव्वाज कुणाचा? अशी आरोळी दिली जाताच आसमंतात घुमणारा शिवसेनेचा पुण्यातील आवाज आता क्षीण झाला आहे. क्षीण म्हणजे एवढा की शेवटची घटका मोजत असल्यासारखा. मग ती शिवसेना (ठाकरे) असो की शिवसेना (शिंदे). दुभंगलेल्या या दोन्ही शिवसेनेची पुण्यातील ताकद किती? गेल्या निवडणुकीत जेमतेम दहा नगरसेवकपर्यंत मजल मारणाऱ्या एकसंध शिवसेनेपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाकडे अवघा एक नगरसेवक. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे राहिलेल्या नऊपैकी एकाने काँग्रेस गाठली आणि आता पाचजणांनी भाजपचा आसरा घेतला. त्यामुळे तीन नगरसेवक राहिलेल्या या पक्षाचे ‘तीन’तेरा वाजले आहेत.

पुणे शहरात शिवसेनेला आजवर फार मोठा जनाधार मिळाला नसला, तरी कार्यकर्त्यांची कधीही कमी पडल्याचे चित्र पहायला मिळाले नव्हते. मात्र, आता कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे पुणेकरांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यासारखी स्थिती या पक्षाची झाली आहे. ही वेळ शिवसेनेवर का आली? याचे आत्मपरीक्षण करण्यासाठीही पदाधिकारी राहिले नाहीत, अशी या पक्षाची सद्या:स्थिती आहे. सत्तेपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेसाठी राजकीय तडजोडी करू लागला आणि तेथून पुण्यात या पक्षाला उतरती कळा लागली.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

हे ही वाचा… जगभरात धास्ती पसरवणाऱ्या ‘एचएमपीव्ही’चा पुण्यात दोन दशकांपूर्वीपासून प्रसार

महापालिका निवडणुकांमध्ये १९९२ पासून या पक्षाची ताकद वाढण्यास सुरुवात झालेली दिसते. १९९२ मध्ये पाच नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर १९९७ मध्ये १५ नगरसेवक होते. २००७ मध्ये २० नगरसेवक होते. त्या वेळी भाजप आणि रार्ष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून तयार झालेल्या राजकारणातील ‘पुणे पॅटर्न’नंतर शिवसेनेला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची महापालिकेतील नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली दिसते. २०१२ च्या निवडणुकीत जेमतेम १५ नगरसेवक निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत अवघे दहा नगरसेवक निवडून आले. दरम्यानच्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी झाल्यानंतर पुण्यात या पक्षाची ताकद वाढण्यापेक्षा आणखी कमी होत गेली. शिवसेनेतील उठावानंतरही शिवसेना (ठाकरे) तग धरून होती. त्यावेळी दहापैकी नाना भानगिरे हे अवघे एक नगरसेवक शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेले. या पक्षाचे ते शहराध्यक्ष झाल्यानंतरही शिवसेना (ठाकरे) पक्षाला फार मोठा फटका बसला नाही. शिवसेना (शिंदे) पक्षाची पुण्यातील ताकद ही मर्यादित राहिली आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येईपर्यंत नऊ नगरसेवकांनी साथ दिली होती. मात्र, त्यापैकी अविनाश साळवे यांनी घरवापसी करत काँग्रेस गाठली. त्यानंतर उर्वरित आठपैकी आता विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट आणि संगीता ठोसर यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि श्वेता चव्हाण या तीन माजी नगरसेवकांवर शिवसेना (ठाकरे) पक्षाची मदार राहिली आहे.

हे ही वाचा… Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप

शिवसेना (ठाकरे) पक्षावर ही नामुष्की का आली? आतापर्यंत पुण्यात महापालिकेबरोबर विधानसभेतही हा पक्ष अस्तित्त्व टिकवून होता. १९७२ पासून पुण्यात या पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविली आहे. पहिल्यांदा कसबा विधानसभा मतदारसंघात काका वडके हे उमेदवार होते. १९९० मध्ये झालेल्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री शशिकांत सुतार हे शिवसेनेचे पुण्यातील पहिले आमदार म्हणून निवडून आले. १९९५ च्या निवडणुुकीत सुतार यांच्यासह तत्कालीन भवानी पेठ मतदारसंघातून दीपक पायगुडे आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सूर्यकांत लोणकर असे तीन आमदार होते. शिवाजीनगर मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाल्यावर निर्माण झालेल्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले. हडपसर हा २००९ मध्ये स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर त्या ठिकाणीही महादेव बाबर विजयी झाले. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात कोथरुडमधून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी फिरकलेही नाहीत. शिवाय शिवसेना दुभंगल्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुण्याकडे पाठ फिरवल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आधार देण्यासाठी कोणी वाली राहिला नसल्यासारखी स्थिती आहे. परिणामी शिवसेनेचा आवाज क्षीण झाला आहे. आव्वाज कुणाचा? अशी आरोळी दिल्यास कुणाचाच नाही, अशी या पक्षाची गत झाली आहे.

Story img Loader