संजय जाधव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शुक्रवारी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची समितीने कसून चौकशी केली. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने मागितली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. समितीच्या सदस्यपदी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार हे आहेत.
आणखी वाचा-फिरत्या स्वच्छतागृहांचे काम अजित पवार यांच्या निकटवर्तीयाला? जाणून घ्या काय आहे प्रकरण
समितीने शुक्रवारी सकाळीच ससूनमध्ये हजेरी लावली. समितीने अधिष्ठाता कार्यालयात चौकशी सुरू केली. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची समितीने चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजीत धिवारे, कैदी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कैदी कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि कैदी रुग्ण समिती अध्यक्षांना याप्रकरणी लेखी अहवाल देण्यास समितीने सांगितले आहे. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैदी रुग्णांचा अहवाल समितीने मागितला आहे. त्यात कैदी रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयात दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे डॉक्टर आदी माहितीचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-पालकमंत्र्यांकडून ससूनच्या अधिष्ठात्यांची कानउघाडणी
ससूनच्या चौकशीचा फेरा
- अधिष्ठात्यांपासून शिपायापर्यंत चौकशी
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागविला
- रुग्णालयात २०२० पासून आतापर्यंत दाखल कैदी रुग्णांचे अहवाल
- कैदी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी
- कैदी रुग्ण समितीच्या नियुक्तीबाबतही विचारणा